1 min read

राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिक्षण मंत्र्यांशी चर्चा. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवाव्यात:: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी

Loading

राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिक्षण मंत्र्यांशी चर्चा. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवाव्यात:: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी
मुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी ) 20% अनुदान मंजूर झालेल्या शाळेत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या व पवित्र पोर्टल अगोदर नियुक्ती केलेल्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता नसलेल्या शिक्षकांना 10 जून 2022 च्या शासन निर्णयातील अटी शिथिल करून वयक्तिक मान्यता दयावी, व 20% अनुदान मिळावे म्हणून शिक्षक सेनेचं प्रांत अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट घेऊन मागणी केली केली आहे.
यातील अटी शिथिल करून मान्यता देऊ असे शिक्षण मंत्री आदरणीय दिपकजी केसरकर साहेबांनी सांगितले.
तसेच शेवटच्या वर्गाची पटसंख्या 2023-23 या वर्षाची गृहीत धरण्यात यावी. कनिष्ठ महाविद्यालय चुकून इंग्रजी माध्यम नोद झालेल्या शाळानां,20% अनुदान मंजूर करावे. शलार्थ देणे प्रक्रिया फास्ट करावी, पुणे विभाग खूप तक्रार आहेत. संचलक स्तरावर प्रलंबित अघोषित शाळा प्रस्ताव तात्काळ शासनाने मागवून 31 डिसेंबर पूर्वी अनुदान घोषित करावे. संचमान्यात दुरुस्ती साठी NIC सहकार्य करत नाही, अनेक शाळा अनुदान पासून वंचित आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत अर्धवेळ शिक्षणकांना पूर्णवेळ करावे.तसेच IT शिक्षकांना मंजुरी देऊन अनुदान दयावे. सेल्फ फायनस शाळाना RTE 25% प्रवेश प्रतिपूर्ती शुल्क त्वरित मिळावे.
शिक्षकांचा मान सन्मान वाढवण्यासाठी शिक्षकांच्या नावापुढे “TR ” सिम्बॉल लावण्याचा शासनाने त्वरित पारित करावा.इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *