1 min read

प्रताप महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी

Loading

प्रताप महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात दि. ७ व ८ डिसेंबर रोजी प्रताप महाविद्यालयाच्या वसतिगृहातील मुला-मुलींची वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६५ मुलींची व ५२ मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. मिलिंद नवसारीकर व डॉ. माधुरी जोशी यांनी तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. ए. बी.जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, वसतिगृह प्रमुख डॉ. अमित बी पाटील, सहप्रमुख प्रा. बालाजी कांबळे, जितेंद्र रायसिंग, संदीप सोनवणे, सुरेश सोनवणे, कविता चौधरी, मायाबाई चावरिया, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *