1 min read

रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुलरच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त जिल्हास्तरीय अ गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन!

Loading

रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुलरच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त जिल्हास्तरीय अ गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन!

ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात २०१४ साळी रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलची स्थापना झाली,
२०२३-२०२४ हे रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलचे १० वे वर्ष असुन त्यांनी दशकपूर्ती सोहळ्यानिमित्ताने युवा महोत्सव अंतर्गत ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दि.७/१२/२०२३ ते दि.१०/१२/२०२३ या कालावधीत जिल्हास्तरीय मॅट वरील पुरुष “अ” गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जिल्हा परिषद केंद्र शाळा काल्हेर येथे करण्यात आले आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलचे अध्यक्ष श्री.भानुदास काशिनाथ पाटील व सचिव श्री. संदेश भाईर यांनी प्रत्यक्ष आमचा प्रतिनिधीशी बोलताना दिली. रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलची स्थापना झाल्यापासून गेल्या दहा वर्षात त्यांनी अनेक सामाजिक, वृक्षारोपण ,रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, अंध,अपंग, निराधार, तसेच वृद्धाश्रम व अनाथ आश्रम यांना प्रत्यक्ष भेट देऊन मदत कार्य केले आहे, शालेय क्रीडा स्पर्धा ,पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा ,ओपन जिम शाळांमध्ये संगणक तसेच स्वच्छता ग्रह ऊभारणी व शाळा दुरुस्ती, त्याच प्रमाणे क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक उपक्रम राबवून आपल्या फाउंडेशन चे नाव संपूर्ण भिवंडी तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोचविले आहे, रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलची स्थापना झाल्यापासून त्यांनी अनेक उपक्रम राबवले त्यामध्ये ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सर्वात मोठी स्पर्धा असल्याचे बोलले जात आहे. ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *