1 min read

शेडनेट गैरव्यवहार प्रकरणाची कठोर चौकशी करुन पिडीत शेतकऱ्यांना न्याय द्या-पोलिस अधीक्षक एन राज कुमार यांना निवेदन

Loading

शेडनेट गैरव्यवहार प्रकरणाची कठोर चौकशी करुन पिडीत शेतकऱ्यांना न्याय द्या-पोलिस अधीक्षक एन राज कुमार यांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी
शेडनेट गैरव्यवहार प्रकरणात अशोक आधार पाटील सभापती कृ उ बाजार समिती अमळनेर त्यांचा शालकं समाधान दिगंबर शेलार शेडनेट उभारणी करणाऱ्या कँपन्या चे मालक,कृषी खाते चे काही कर्मचारी,बँक कर्मचारी व इतर सहभागी असलेले लोक यांच्या बद्दल आज पोलिस अधीक्षक एन राज कुमार साहेबांची भेट घेतली असता शेडनेट घोटाळा अमळनेर सह जळगांव धुळे,नंदुरबार, अहमदनगर, नाशिक, जालना ,बीड व इतर जिल्ह्यात याची व्याप्ती कशी आहे तसेच हा घोटाळा 100 कोटी रु पेक्षा कसा जास्त आहे याची माहिती सांगितले हे सर्व करून दलाल व यासंबंधित ठेकेदारांनी शेतक्यांना कर्ज बजारी करून मृत्यू च्या दाराशी कसे आणून ठेवले शेतकऱ्यांची फसवूनक कशी झाली,आर्थिक फसवणूक कशी झाली,या बाबत सविस्तरपणे माहिती व तक्रार देऊन चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली , तसेच पोलीस अधीक्षक साहेबांनी चौकशी पारदर्शक करू व दोषी वर कारवाई करू असे आश्वासन दिले. सोबत अनंत निकम उपशहर प्रमुख,उबाठा सचिन वाघ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचीन पाटील,
कार्यकर्ता कैलास पाटील,दिनेश पाटील, नारायण पाटील,ईश्वर पाटील,उमाकांत पाटील आदी शेतकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *