ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये फूड फेस्टिवलचे आयोजन
![]()



ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये फूड फेस्टिवलचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये “भव्य फूड फेस्टिवल” चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा ॲड ललिता पाटील, सचिव प्रा.शाम पाटील, प्राचार्य श्री. नीरज चव्हाण सर उप प्राचार्य अश्विनी चौधरी उपस्थित होते.
सर्वात आधी सरस्वती पूजन व अन्नपूर्णा देवीचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावर्षी इयत्ता आठवी,नववी, दहावीतील विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून डॉ. लीना पाटील, डॉ.प्रतिभा मराठे आणि अनिता पाटील यांनी काम पाहिले.
फूड फेस्टिवल मध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पक्वान्न बनवत पाककलेच्या गुणांचे दर्शन यावेळी घडविले.
उपस्थित मान्यवरांनी व परीक्षकांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांचे कौतुक व परिक्षण केले.
परीक्षकांनी सर्व स्टॉलवर भेट देऊन विद्यार्थ्यांकडून त्यांच्या बनवलेल्या पदार्थांची माहिती जाणून घेतली व परीक्षकांनी स्पर्धेतील एकूण वीस संघांपैकी पहिल्या तीन उत्कृष्ट स्टॉलची निवड केली. स्टॉल विद्यार्थ्यांमार्फत लावण्यात आले होते. विशेष करून या कार्यक्रमास पालकांनी सुद्धा हजेरी लावली व विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री.विलास पाटील यांनी सर्व मान्यवरांचे, परीक्षकांचे व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

