1 min read

अमळनेर तालुका काँग्रेस आदिवासी विभागाच्या तालुकाध्यक्षपदी शार्दूल पवार

Loading

अमळनेर तालुका काँग्रेस आदिवासी विभागाच्या तालुकाध्यक्षपदी शार्दूल पवार

अमळनेर: जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री बाळासाहेब प्रदीपरावजी पवारसाहेब यांच्या मान्यतेनुसार, अमळनेर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मा.श्री. गोकुळ आबा बोरसे व अमळनेर काँग्रेस शहराध्यक्ष मा.श्री. मनोज बापु पाटील तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते मा. श्री के.डी. बापु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुका काँग्रेस आदिवासी विभागाच्या तालुकाध्यक्ष पदी मा.श्री शार्दुल सोमसिंग पवार उर्फ रावसाहेब पवार (रा. ढेकु सिम ता अमळनेर) यांची नियुक्ती जळगाव जिल्हा काँग्रेस आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष मा.संजय जमादार यांनी केली. हि नियुक्ती जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. याप्रसंगी काँग्रेस आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष मा.संजय जमादार, काँग्रेसचे जेष्ठ नेते मा.के.डी.पाटील , जळगाव जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मा.ज्ञानेश्वर कोळी, जिल्हा सरचिटणीस मा.जमील शेख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव मा. आशुतोष पवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव मा.तुषार संदानशिव, धरणगाव काँग्रेस शहराध्यक्ष मा. अनंत परिहार अमळनेर विधासभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील , मा.मनोज सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *