वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत गरजूंना दिले मिष्टांन भोजन
![]()
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत गरजूंना दिले मिष्टांन भोजन
लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले यांचा उपक्रम..



अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- वाढदिवसाच्या निमित्ताने हजारो रुपये खर्च केले जातात पण याला अपवाद दैवत येथील लोकनियुक्त सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत गरजूंना
मिष्टांन भोजन देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून त्यांना आपला वाढदिवस साजरा केल्याचे सार्थक वाटले. दरवर्षी ते आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबवून तळागाळातील उपेक्षित लोकांना मदत करत असतात..
वाढदिवसाचे औचित्य साधून शिर्डी येथील साईआश्रय शिर्डी येथील वृध्दाश्रमात दिव्यांग व अनाथ मुलांना सोबत त्यांना मिष्टान्न भोजन त्यांचे उपयोगी वस्तू देऊन त्यांच्या सोबत रुचकर भोजनाचा आनंद घेत त्यांच्या संवाद साधुन त्यांचे दुःख जाणुन घेतले त्यांच्या पैकी दिव्यांग आणि जिद्दीने ११ शस्त्रक्रियावर मात करुन यशस्वी जीवन जगणाऱ्या चिमकुली “श्रद्धा “चे हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला.सर्व उपस्थित वृद्ध माता पिता , दिव्यांग अनाथ त्यांच्या चेहऱ्यावर थोडे तरी हसू मी. फुलवू शकले याचा मला खूप मनस्वी आनंद झाला.तसेच याठिकाणी दाखल झालेले २५० व्यक्तींचा सांभाळ मुलांसारखे करणारे गणेशभाऊ यांचे तसेच त्यांचे मातोश्री यांचे कार्यही खूप कौतुक करण्यासारखं आहे असे सौ सुषमाताई देसले पाटील यांनी सांगितले..
सो सुषमाताई पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय, पत्रकारिता सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या…

