४डिसे.पासून मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत खान्देशातील चित्रकारांचे समूह चित्रप्रदर्शन..
![]()

४डिसे.पासून मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत खान्देशातील चित्रकारांचे समूह चित्रप्रदर्शन..
खान्देशातील चित्रकारांचे जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी मुंबईत ” जिविधल” शिर्षक असलेलं समूह चित्रप्रदर्शंन दि.४डिसे.ते१०डिसे. या कालावधीत होत आहे.चित्रकार जितेंद्र साळुंके,विरेंद्र सोनवणे,धनराज पाटील,लक्ष्मीकांत सोनवणे यांनी विविध शैलीतील सामाजिक आशयाची तसेच नैसर्गिक घटकांची चित्र साकारलेली आहेत.
या चित्र प्रदर्शंनात
जितेंद्र साळुंके यांची सामाजिक आशयाची काळ्या शाईतील पेपर माध्यमातील सृजन चित्र रेखाटलेली आहेत.चेहरा हरवलेली माणसं,आक्रोश,यातना,निरागसता असे विषय आहेत.त्यांची हंस,मौज,अनुष्टुभ,कवितारती या दर्जेदार वाडःमयीन नियतकालिकांतून रेखाटने प्रकाशित झालेली आहेत. साळुंके यांना विविध कला पारितोषिके तसेच मुंबई,पुणे जळगाव.ठिकाणी चित्र प्रदर्शंने झालेली आहेत.ते चोपडा येथील रहिवासी असून चोपडा नगरपालिकेत नोकरीला आहेत.
विरेंद्र सोनवणे यांची चित्रे माणसांतील प्रवृतींना चित्र रूपात मांडत असतांना निसर्गातील प्राणी- पक्षी यांच्यातील हिंसकता,लढाऊवृती,भित्रेपणा अशा स्वभाववृती माणसांच्या जगण्यातील आहेत.याचा आशय घेऊन सोनवणे यांनी काळीशाई-पेपर वरील आणि कॅनव्हास चित्रे आशयानुरूप रेखाटलेली आहेत.विषयांना माध्यमात बंदिस्त करतांना पक्षी हा काही चित्रांत प्रतीक म्हणून वापरला आहे. विरेंद्र यांची मुंबई,ठाणे इ.ठिकाणी चित्र प्रदर्शने झालेली आहेत.चित्रकार हे हातेड येथील रहिवासी असून ते मुंबई सायन येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
धनराज पाटील यांची नैसर्गिक घटकातील पाने,फुले,झाडांचे अमूर्त आकार यांतून चित्र साकारलेली आहेत.पानांचे सुक्ष्म रेखाटन,सुकलेली जीर्ण झालेल्या पानांचे बारकाव्याचे रेखाटन तसेच पांढर्या लाल रंगातील पिंपळपान आकर्षित करतात.आणि त्यातील सुक्ष्म बारकावे चित्रात सर्वदूर पहावयास मिळतात.पाटील यांची पुणे, मुंबई,जळगांव इ.ठिकाणी चित्र प्रदर्शने झालेली आहेत.पाटील हे पारोळा येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
लक्ष्मीकांत सोनवणे यांनी कष्टकरी माणसांचे जगणं कॅनव्हासवर मांडलेले आहे.चित्रकार ग्रामीण भागातील असल्याने,परीसरातील माणसांच्या जिवनाचे चित्र कॅनव्हास तसेच काळ्याशाई या माध्यमात रेखाटलेली आहेत.काळया शाईतील सामाजिक आशयातील चित्रे अधिक वेधक ठरतात.सोनवणे यांनी राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवरील अनेक कलाप्रदर्शंनात सहभाग घेतलेला आहे.त्यांची मुंबई,दोंडाईचा,सेंधवा इ. ठिकाणी चित्र प्रदर्शंने झालेली आहेत. सोनवणे हे विरवाडे येथील रहिवासी असून,शिंदखेडा येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन दि.४डिसे. प्रसिद्ध चित्रकार व सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट, मुंबई या प्रख्यात कलासंस्थेतील प्रा.राजेंद्र पाटील यांच्या हस्ते होत आहे.या प्रसंगी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट चे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे,प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश देशपांडे,मा.प्राचार्य राजेंद्र महाजन.(चोपडा) हिरामण पाटील (मुंबई) कवी बाळकृष्ण सोनवणे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कलावंताचे मान्यवर,मित्र परिवार, साहित्यीक तसेच ललित कला केंद्र चोपडा,येथील प्राचार्य व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केलेले आहे. सदर प्रदर्शंन ४ते१० डिसेंबर पर्यंत पहाता येईल.

