1 min read

मुनाफ रहिमान तडवी प्रोटान संघटनेच्या वतीने उपक्रम शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Loading

मुनाफ रहिमान तडवी प्रोटान संघटनेच्या वतीने उपक्रम शिक्षक पुरस्काराने सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी
शारदा माध्यमिक विदयालय व एन. एम. कोठारी कनिष्ठ महाविद्यालय कळमसरे ता. अमळनेर जि. जळगाव येथील उपक्रमशील शिक्षक यांना नुकताच प्रोटान संघटनेच्या वतीने नुकताच संघटनेच्या पदाधिकारी मान्यवरांच्या वतीने उपक्रम शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानपत्र व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले
मुनाफ तडवी हे हिंदी विषयात मुलांना संवाद कौशल्य वाढविण्यासाठी उपक्रम राबविले. हिंदी विषयाचे वाचन वाढविण्यासाठी मुलांना हिंदी विषयाची विविध विषयाची साहित्यिक लोकांची पुस्तके देऊन वाचन चळवळ राबविली. दरवर्षी 14 सप्टेंबर हिंदी दिवसाला मान्यवरांचे भाषणे आयोजित केली. हिंदीत बोलण्यासाठी मुलांना प्रवृत्त केले. क्रीडा स्पर्धेसाठी मुलांना क्रिकेट, व्हॉलीबॉल यासाठी तयार केले. मुलींचा हॉलीबॉल संघ तालुक्यात प्रथम आणला व जिल्हास्तरावर पाठवला. शाळेत विद्यार्थ्यांना परेड साठी तयार केले. स्काऊट प्रमुख असतांना विविध शिबीरे आयोजित करुन शाळेत स्काऊट गाईड मुलामुलींना शिस्त लावली.
कोरोना काळात गरजूंना धान्य वाटप केले. पुरोगामी चळवळीत भाग घेऊन महात्मा फुले, शाहू महाराज,डाॅ. आंबेडकर यांच्या कार्याचा प्रचार पसार केला. तडवी समाजाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी समाजात जनजागृती केली. समाजातील गरजूंना आर्थिक मदत केली. विविध सामाजिक संघटनांच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
त्यांचे अभिनंदन शारदा माध्यमिक विद्यालय व एन एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालय कळमसरे येथील संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्रशासन अधिकारी भाऊसाहेब जी.टी.टाक, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे, सचिव दिलीप पाटील,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्शुलकर, खजीनदार राजेंद्र पाटील व सर्व पदाधिकारी ,
व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *