1 min read

व्यवस्था नाकारत पर्याय देणारा महापुरुष महात्मा फुले-मुकुंद सपकाळे

Loading

व्यवस्था नाकारत पर्याय देणारा महापुरुष महात्मा फुले-मुकुंद सपकाळे
सामाजिक स्थिती व्यवस्थेने वंचित, उपेक्षित, गोरगरीब बहुजनांना स्पृश्य अस्पृश्य भेदाभेदाला नाकारण्यासाठी आंदोलन छेडत व्यवस्था नाकारणारे महात्मा जोतिराव फुले खऱ्या अर्थाने महापुरुष होते असे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे राज्य अध्यक्ष मुकुंद सपकाळे सपकाळे यांनी सत्यशोधकी साहित्य परिषद, सत्यशोधक समाज,भीम रमाई प्रतिष्ठान आयोजित महात्मा फुले स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात मत व्यक्त करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवराज माळी होते.सपकाळे पुढे म्हणाले, महाराज सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज यांनी गौरविलेल्या महापुरुषाचे अतुलनीय कार्य आजही समाज व्यवस्थेला दिशादर्शक असल्याचे देखील त्यांनी याप्रसंगी मांडले स्मृती दिवसानिमित्त दिलीपभाऊ सपकाळे, शिवराम शिरसाट, विजय लूल्हे, युवराज माळी यांनी मनोगत व्यक्त केली महात्मा फुले यांच्या प्रतिमेला विजयकुमार मौर्य यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी केले तर आभार डॉ. मिलिंद बागुल यांनी मानले. कार्यक्रमास संगीता माळी,आकाश सपकाळे, सुनील पाटील, सागर गुरव, धीरज पाथरवट, गिरीश चौगावकर, शरद महाजन व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *