1 min read

शिक्षकांचे ज्ञानदान सर्वत्तोम दान – संदीप घोरपडे,
राजेंद्र शिंपी सर यांचा शहापूर येथे सेवापूर्ती कार्यक्रम ——

Loading

शिक्षकांचे ज्ञानदान सर्वत्तोम दान – संदीप घोरपडे
राजेंद्र शिंपी सर यांचा शहापूर येथे सेवापूर्ती कार्यक्रम ——

कळमसरे ता. अमळनेर —-
व्यक्ती दान करताना बऱ्याचदा व्यक्तिगत दान करून सर्वत्र स्वतःचा धिंडोरा पिटतो. मात्र शिक्षक-गुरु हा ज्ञान दान करताना कधीच व्यक्तिगत काम करीत नाही. तो नेहमी समाजहीत जोपासतो. असे प्रतिपादन शहापूर ता. अमळनेर येथील गौरेश्वर शिक्षण संस्था संचलित एकात्मता माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक राजेंद्र गंगाराम शिंपी सर सेवानिवृत्त झाले. त्याप्रसंगी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे हे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सी. एम.पाटील या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, संदीप घोरपडे, यांची उपस्थिती होती.
श्री. राजेंद्र शिंपी सर यांनी शहापूर येथील माध्यमिक विद्यालयात तेहतीस वर्ष सेवा केली. यावेळी श्री शिंपी सर यांचा सहपरिवार शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक -शिक्षकेतर, येथीलशहापूर ग्रामस्थांनी सत्कार- समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी श्री.शांताराम पाटील, श्री. आर. डी. पाटील सर, मुकेश पाटील सर, संदीप पाटील सर, धनगर सर,अभिषेक शिंपी, नीलेश शिंपी, यांनी मनोगत व्यक्त केले. तर सेवानिवृत्त शिक्षक यांनी सत्काराला उत्तर म्हणून आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. यु. जाधव सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकात्मता माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *