1 min read

मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट जिल्हाध्यक्ष विकास पाटील तर उपाध्यक्षपदी राजू बाविस्कर यांची नियुक्ती..

Loading

मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट जिल्हाध्यक्ष विकास पाटील तर उपाध्यक्षपदी राजू बाविस्कर यांची नियुक्ती..

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगाव : तालुक्यातील पत्रकार संघटनेचे सदस्य व बाभुळगाव येथील पत्रकार विकास पाटील यांची मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट या राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी विकास पाटील तर खर्दे येथील पत्रकार राजू बाविस्कर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. आजपावेतो श्री.पाटील व श्री.बाविस्कर यांनी समाजाच्या हितासाठी, भारतीय संविधानाला अभिप्रेत शास्वत विकासासाठी, सामाजिक न्याय हक्कांसाठी, संरक्षणासाठी, प्रशासकीय बेजबाबदारपणा, अन्यायाच्या विरूद्ध वाचा फोडणे, त्याचप्रमाणे पत्रकारिता क्षेत्रातून उपेक्षित, वंचित व दुर्लक्षितांच्या प्रश्नांना सामोरं जावून वाचा फोडण्याच्या कामातून आणि विवीध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेत मानव सेवा सुरक्षा ट्रस्टचे संस्थापक,अध्यक्ष गजानन इंगळे यांच्या आदेशाने सचिव अरुण पांडव, राज्य पदाधिकारी सौ. संगीताताई साबणकर, वसंत घायाळ, वैभव रौदळ, प्रकाश तांबळे, राजेंद्र गिरी, राजेंद्र कुमार ठाकूर, ॲड. किशोर पांचाळ, राजेंद्र तायडे, ज्योतीताई बावस्कर, रानीताई पवार, योगिताताई टिपणीस आदींसह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मानव सेवा सुरक्षा ट्रस्टच्या माध्यमातून उपेक्षित, दुर्लक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकारी विकास पाटील व राजू बाविस्कर यांनी विश्वास व्यक्त केला. सदरील नियुक्तीबद्दल जळगांव जिल्ह्यासह, धरणगाव तालुका परिसरातून व पत्रकार संघटनेकडून शुभेच्छा व अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *