1 min read

नियोजना अभावी एस. टी. प्रवाशांचे हाल

Loading

नियोजना अभावी एस. टी. प्रवाशांचे हाल

कळमसरे प्रतिनिधी(मोतीलाल महाजन) दिनांक 20 नोव्हेंबर 2023 वार सोमवार.
कळमसरे येथे आज सुमारे अंमळनेर ते शिरपूर गाडी क्रमांक MH 06 S 8488 ही बस गाडी कळमसरे या गावी पंचर झाली. एस. टी बस चालक – वाहक यांनी स्थानकात संपर्क साधला. त्यांनी एस. टी. बस तिथेच थांबवा थोड्या वेळात दुरुस्तीसाठी येत आहेत असे कळवण्यात आले. पाऊणे सहा वाजले तरी कोणीही आहे नाही. एस. टी. मॅनेजर यांनी संपर्क साधला असता, ” मला पंधरा मिनिटांपूर्वी कळाले, थोड्या वेळात दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले आहे ” असे त्यांनी उत्तर दिले.
यामुळे या मुळे प्रवाशांचा अधिकच मनस्ताप वाढला व त्यांनी संताप व्यक्त केला.
पुढे प्रवसा करणाऱ्या प्रवाशांचे नियोजन चुकले.या प्रवाशांच्या गैरसोयसाठी कोण जबाबदार राहील?असा सवाल आता उठत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *