सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या ग्रंथपाल सिमा धाडकर यांचे निधन झाल्याने वाचनालयात शोकसभा…
![]()

सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या ग्रंथपाल सिमा धाडकर यांचे निधन झाल्याने वाचनालयात शोकसभा…
अमळनेर प्रतिनिधी-पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या ग्रंथपाल सिमा धाडकर (69) यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांची शोकसभा सानेगुरुजी वाचनालयात आयोजित करण्यात आली.
यावेळी सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे,चिटणीस प्रकाश वाघ,विश्वस्त बापू नगांवकर सदस्य भिमराव जाधव,अँड रामकृष्ण उपासनी,ईश्वर महाजन, दिपक वाल्हे व सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षेचे केंद्र संचालक विजयसिंह पवार व वाचनालयाचे कर्मचारी व वाचक व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रंथपाल सिमा धाडकर मँडमांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत अल्पशा आजाराने निधन झाल्याने सर्वांनी शोक व्यक्त केला.

