1 min read

सह्याद्री पतसंस्थेच्या दीपावली स्नेहसंमेलनाचा आदर्श इतर पतसंस्थांनी घ्यावा- विश्वास थळे
सह्याद्री पतसंस्थेचा दीपावली स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न!

Loading

सह्याद्री पतसंस्थेच्या दीपावली स्नेहसंमेलनाचा आदर्श इतर पतसंस्थांनी घ्यावा- विश्वास थळे
सह्याद्री पतसंस्थेचा दीपावली स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न!

ठाणे,भिवंडी (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव सर्वप्रथम घेतले जाते, या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी तथा शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख श्री.विश्वास थळे यांच्या संकल्पनेतून गेली ३० वर्ष सातत्याने अखंडितपणे दीपावली स्नेहसंमेलन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा, काव्य संमेलन असे अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते.
गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम पतसंस्थेच्या सभागृहात घेतला जात होता मात्र यावर्षी सदर कार्यक्रम ओसवालवाडी सभागृह नारपोली अंजुर फाटा येथे घेण्यात आला, यावेळी कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष विश्वास थळे, उपाध्यक्ष डॉ.अरुण पाटील, संचालक मंडळ .डी.के.म्हात्रे,. प्रमोद पाटील,चक्रधरी पाटील,मोहन गायकवाड,.सुदाम भोईर, सौ.स्नेहा कारेकर ,सौ.सुरेखा जाधव, तर विशेष अतिथी म्हणून मा.साहेब पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मदन (अण्णा) पाटील, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ.किशोर बळीराम पाटील, सखी पतसंस्थेचा संचालिका सौ. वैजयंती विश्वास थळे, सौ. जयश्री प्रमोद पाटील, पतसंस्थेचे सह सर- व्यवस्थापक ॲड. संजय यशवंत पाटील, शाखाधिकारी शिवाजीनगर सौ. अनिता चंद्रकांत ताटे, शाखाधिकारी टेमघर सौ. संगीता किशोर पाटील, शाखाधिकारी मानकोली मेननाथ भोईर, शाखाधिकारी पडघा दिलीप पाटील, शाखाधिकारी सावद अनंता पाटील, शाखाधिकारी अंबाडी .विजय पाटील, शाखाधिकारी खडवली संजय रमेश पाटील, वरिष्ठ अधिकारी गोरख थळे, जगदीश भोईर,विलास सोनवणे,कु.जोत्सना पाटील,.केतन पुण्यार्थी, योगेश म्हात्रे, पप्पू पाटील,तानाजी भोईर, कु. माधुरी पाटील,शप्रताप नाईक सौ.मंथना सूर्यकांत पाटील, संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग, दैनंदिन ठेव प्रतिनिधी व संस्थेचे सर्व ठेवीदार, सभासद तथा हितचिंतक कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली ३०वर्ष सह्याद्री पतसंस्था ही दीपावली स्नेहसंमेलनाचे आयोजन करते या मागचा एकमेव हेतू म्हणजे माझ्यासोबत जोडलेले कुटुंबीय आहेत त्यामध्ये कुटुंबातील सदस्य कोणकोणत्या कलेमध्ये प्राविण्य आहे, कोणाला कशाची आवड आहे कोण वकृत्व चांगले करू शकतो, नृत्य करू शकतो, गायन करू शकतो, कविता करू शकतो या सर्वांची माहिती या निमित्ताने मिळते, त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्याला आपल्या अंगातील कला गुणांचे प्रदर्शन करण्याची संधी या व्यासपीठामुळे मी देण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्हा आम्हा सर्वांना यानिमित्ताने का होईना आपल्याला मिळालेल्या संधीच सोन करता येते, म्हणूनच हा स्नेहसंमेलन मेळावा म्हणून साजरा केला जातो, यापुढे जाऊन सह्याद्री पतसंस्था ही कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देते त्यासाठी सहकार भवन सावद नाका येथे साकारले आहे, त्याचप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्ती प्रमाणे आम्ही संस्थेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम विविध ठिकाणी घेत असतो, तसेच पाणी आडवा पाणी जिरवा या शासनाच्या धोरणानुसार वनराई बंधारे बांधण्याचे काम आमची पतसंस्था शासनाच्या बरोबरीने करत आहे, म्हणूनच मी दैनिक स्वराज्य तोरणच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील पतसंस्थांना जाहीर आवाहन करतो की
सह्याद्री पतसंस्थेच्या दीपावली स्नेहसंमेलनाचा व इतर स्तुत्य उपक्रमांचा आदर्श इतर पतसंस्थांनी घ्यावा असे सह्याद्री नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास थळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *