1 min read

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती वर करोडो रूपायाचा फसवणूकीचा आरोप

Loading

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती वर करोडो रूपायाचा फसवणूकीचा आरोप

पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सचीन पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे अनंत निकम यांचे आरोप

अमळनेर प्रतिनिधी-कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्यावर पोखरा योजने अंतर्गत करोडो रूपायाचा भ्रष्टाचार चा आरोप अमळनेर येथे जुना टाऊन मध्ये झालेल्या पत्रकार परीषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे तालुकाध्यक्ष सचीन पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अनंत निकम यांनी पत्रकार परिषदेत केला.
सविस्तर माहिती अशी कि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमीनीवर लाखो रूपयाचे कर्ज काढून निकृष्ट दर्जाचे शेडनेटचे साहित्य विकत घेऊन दोन लाखाचे होते याबाबत तक्रार केली पण कोणी दखल घेतली नाही याप्रमाणे यशोदाबाई पाटील दिनेश पाटील व ग्रामीण भागातील नारायण पाटील यांनी लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सचिन पाटील अनंत निकम यांच्याकडे केली व यांनी तात्काळ दाखल घेऊन त्यांच्याकडे जाऊन सगळी शहानिशा करत तात्काळ पत्रकार परिषद घेऊन वरील करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे भिंग पत्रकार परिषद फोडले यावरून संबंधित अधिकाऱ्यांवर व जे जे व्यक्ती याच्यात सामील झाले असतील व शेतकऱ्यांची लुबाडणूक केली असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी पत्रकार परिषद त्यांनी केली. या प्रकरणाचा ते पुढे पर्दाफाश करणार आहेत.

चौकट
अनुदानही शेतकऱ्यांचे आधार नोंदणी असलेल्या खात्यावर येत असल्याने यात कोणत्याही गैरप्रकार झालेला नाही. केवळ राजकीय द्वेषापोटी हा आरोप केला जात आहे. उलट चौकशी करायला तयार आहोत..
अशोक आधार पाटील
सभापती
कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *