1 min read

मंगळग्रह मंदिरात वसूबारस निमित्त गोपूजन

Loading

मंगळग्रह मंदिरात वसूबारस निमित्त गोपूजन

अमळनेर :

गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस या दिवसापासून दिवाळी सुरू होते. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. त्यानुसार येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिरात विधीवत सवत्स धेनू पूजन करण्यात आले.
९ रोजी वसू बारसचे औचित्य साधत मंदिरात मंत्रोच्चाराने अध्यक्ष डिगंबर महाले यांनी सपत्नीक गायीचे पाद्यपूजन करुन पूष्पमाला अर्पण केली व सौभाग्याचे अलंकार प्रदान करत नैवद्येही देण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त डी. ए. सोनवणे, आशा महाले, सेवेकरी व्ही. व्ही. कुलकर्णी, पुजारी मंदार कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व व्हॉइस आॅफ मीडियाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *