1 min read

कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेला जोरदार प्रतिसाद. १४ वर्षाखालील मुलांचा गटात ,नूतन विद्यालय प्रथम तर नूतन ज्ञांनमंदिर द्वितीय स्थानी..

Loading

कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेला जोरदार प्रतिसाद. १४ वर्षाखालील मुलांचा गटात ,नूतन विद्यालय प्रथम तर नूतन ज्ञांनमंदिर द्वितीय स्थानी..

ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित, जिल्हास्तरीय शालेय खो खो क्रीडा स्पर्धा कल्याण पश्चिम येथील मॅक्सी ग्राउंड वर आज,स्पर्धा संनियंत्रक कृष्णा माळी, दिनेश पवार,स्वामी विद्यालयाचे लजपत जाधव, संजय तरे, यांचा उपस्थितीत क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे यांचा हस्ते १४ वर्षाखालील मुलांचा कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.४० संघांनी सहभाग नोंदवला. चूर्शीचा अंतिम सामन्यात छत्रपती शिक्षण मंडळाचा कल्याण पश्चिम येथील नूतन विद्यालय व कल्याण पूर्व मधील नूतन ज्ञानमंदिर या संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट असे खेळाचे प्रदर्शन केले. या सामन्यात नूतन विद्यालय कल्याण पश्चिम या संघाने प्रथम क्रमांकावर बाजी मारली. विजयी संघाना मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख,आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी प्रत्येकी ५०० रुपयाचे रोख पारितोषिक देऊन कौतुक आणि अभिनंदन केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत पाटकर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक विवेक म्हात्रे, के.रा कोतकर विद्यालयाचे संजय तरे, स्वामी दत्तनगर विद्यालयाचे लजपत जाधव, शिवाई बालक मंदिर चे क्रीडा शिक्षक पद्माकर खरे, एस आय ए इंग्लिश स्कूलचे योगेश खोरगडे, ओमकार इंग्लिश स्कूल चा प्रतिभा जाधव, जनगणमन इंग्लिश स्कूलच्या, सेंट जॉन विद्यालयाचे संदीप परदेशी, तसेच सर्व सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक व संघटक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.संपूर्ण स्पर्धेच्या पंच म्हणून नियोजनासाठी तेजस सपकाळ, भारत नाईकनवरे,विनायक मिसाळ,शुभम नाईकनवरे,मानव मोरे,शुभम ढगळे, आदित्य,रितेश मुंडे, यांनी अतिशय चांगले निर्णय देऊन खो खो खेळाडूंना योग्य निकाल देऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट निरीक्षण केले.विजेता संघाचे क्रीडा संघटक सुनिल कोळी, नूतन विद्यालय कल्याण पश्चिम व उपविजेता संघ नूतन ज्ञानमंदिर कल्याण पूर्व मधील वैशाली वाबळे, श्रीमती प्रज्ञा म्हाळुंगे,यांच्यासह सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *