1 min read

आदिवासी विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर स्वयम योजनेचा लाभ मिळणार,अरुणकुमार जाधव ; अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाला भेट

Loading

आदिवासी विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर स्वयम योजनेचा लाभ मिळणार,अरुणकुमार जाधव ; अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाला भेट

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर तालुका स्तरावर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या पण वसतिगृह न मिळालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आता स्वयम योजनेचा लाभ मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त अरुणकुमार जाधव (नाशिक विभाग) यांनी केले. येथील पंडित नेहरू समाजकार्य महाविद्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या समवेत नाशिक विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी सूर्यभान सूडके यांनीपण सदिच्छा भेट दिली. शासन आपल्या दारी अश्या स्वरूपात ही भेट दिली. यावेळी त्यांनी आदिवासी विद्यार्थीयांना भेडसावणाऱ्या विविध समस्या वर चर्चा केली. यावेळी समाजकार्य महाविद्यालय प्राचार्य डॉ पी. एस. पाटील, प्रा विजयकुमार वाघमारे, प्रा. ढगे,डॉ जगदीश सोनवणे, डॉ भरत खंडागळे, डॉ अनिता खेडकर, डॉ श्वेता वैद्य, डॉ सागरराज चव्हाण, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमळनेर- सहाय्यक आयुक्त अरुणकुमार जाधव, सहायक प्रकल्प अधिकारी सूर्यभान सूडके यांच्या समवेत प्राध्यापक वर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *