1 min read

मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत अमळनेरला डिअर तुकोबा नामक विनायक होगडे लिखीत पुस्तकाचे अभिवचन कार्यक्रमाचे आयोजन…

Loading

मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत अमळनेरला डिअर तुकोबा नामक विनायक होगडे लिखीत पुस्तकाचे अभिवचन कार्यक्रमाचे आयोजन…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा, अमळनेर च्या वतीने आयोजित अमळनेर शहरात प्रथमच होणाऱ्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
डिअर तुकोबा नामक विनायक होगडे लिखीत पुस्तकाचे अभिवचन आणि तेही एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांना एकायला आणि पाहायला मिळणार आहे .
यात वाचक स्वर भाऊसाहेब देशमुख, मेघा पाटील, सुनंदा पवार, योगिता साळुंखे ,संदीप घोरपडे व सात संगत योगेश पाटील यांची राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात ५ नोव्हेंबर 2023 रोजी रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता सदर कार्यक्रम होणार आहे.
अमळनेर तालुक्यातील सर्व रसिकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे असे संदीप घोरपडे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *