1 min read

प्रभाग क्रं 14 मधे विद्येश्वर महादेव मंदिर ओपन स्पेस सुशोभीकरणाच्या कामांचे ना.मंत्री अनिल पाटील हस्ते भूमिपूजन

Loading

प्रभाग क्रं 14 मधे विद्येश्वर महादेव मंदिर ओपन स्पेस सुशोभीकरणाच्या कामांचे ना.मंत्री अनिल पाटील हस्ते भूमिपूजन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
प्रभाग क्रं 14 मधे विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड तसेच पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन मदत व पुनर्वसन मंत्री ना.श्री.अनिल भाईदास पाटील तसेच त्यांच्या धर्मपत्नी माजी नगराध्यक्षा तथा मा. जिल्हा परिषद सदस्य सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून 22 मार्च 2023 पाडव्याच्या मुहूर्तावर मंत्री अनिल पाटील यांनी महादेव मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त तेथील नागरिकांना आश्वासन दिले होते मंदिराच्या ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड तसेच पेवर ब्लॉक बसवून देईन.बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आज त्या म्हणीचा प्रत्यय तेथील नागरिकांना आला आहे या कामासाठी मा.नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील तसेच रवि पाटील यांनी पाठपुरावा केला असून भूमिपूजन प्रसंगी अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे तसेच अभियंता अमोल भामरे, दिगंबर वाघ यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून सुरभी कॉलनी, शाहू नगर, गुरुकुपा कॉलनी, भालेराव नगर, आर.के.नगर इ.भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *