प्रताप महाविद्यालयात स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसच्या राष्ट्रीय परिषद संपन्न
![]()

प्रताप महाविद्यालयात स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसच्या राष्ट्रीय परिषद संपन्न
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने (स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस) तर्फे Current and future prospects in lifesciences यावर आधारित एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. एकूण ७० गोषवारे व २५ शोधनिबंध प्राप्त झाले.
प्रथम सत्रात उद्घघाटन प्रसंगी उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून क. ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील लाईफ सायन्सेस विभागातील सूक्ष्मजीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.भूषण चौधरी यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. भूषण चौधरी उदघाटनपर भाषणात बोलताना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधनावर भर द्यावा व समाजहिताच्या दृष्टीने आपले मौलिक दर्जाचे संशोधन करावे. ज्यातून नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल.’ असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी खा.शि. मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांनी परिषदेचे अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, महाविद्यालयाचे संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ.ए.बी.जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ.जी. एच.निकुंभ, डॉ. विजय मांटे, डॉ. कल्पना पाटील, प्रा. पराग पाटील, तसेच डॉ. अशोक तुवर व संसाधन व्यक्ती डॉ. किरण पवार (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), डॉ नफिसा पटेल (वीर नर्मद युनिव्हर्सिटी,नवसारी, गुजरात) डॉ. वृषाली वाघ (वीर नर्मद युनिव्हर्सिटी, नवसारी, गुजरात) विभागप्रमुख डॉ. राजू सरवदे, प्रा.शशिकांत जोशी, प्रा. जे. टी. साळवे प्रा. डॉ अशोक पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.
परिषदेचे प्रास्ताविक प्रा. शशिकांत जोशी यांनी केले, ईशस्तवन प्रा. स्नेहल सूर्यवंशी यांनी केले तर आभार डॉ अशोक पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. हेमलता सूर्यवंशी-भोसले यांनी सूत्रसंचालन केले.
दुसऱ्या सत्रात प्रमुख संसाधन व्यक्ती डॉ. तिरूनहरी युगंधर (तेलंगणा), डॉ. किरण पवार, डॉ.नफिसा पटेल, डॉ. वृषाली वाघ यांनी संशोधनाच्या विविध पैलूंचा आढावा घेतला. यावेळी तेलंगणाचे डॉ. श्रीनिवास यांचीही उपस्थिती होती.
या सत्रात संसाधन व्यक्तींचा परिचय अनुक्रमे प्रा. ममता पाटोळे, प्रा.डॉ. राजू सरवदे, प्रा.वैशाली महाजन, प्रा. स्नेहल सूर्यवंशी यांनी करून दिला. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा जिग्नेश पाटील यांनी केले.
समारोपीय सत्रात प्रमुख अतिथी म्हणून ग.स. हायस्कूलचे चेअरमन व खा.शि.मंडळाचे संचालक हरी भिका वाणी, तर या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ ए. बी. जैन, सर्व संसाधन व्यक्ती, व विभागप्रमुख उपस्थित होते. यात संशोधनात्मक पोस्टर, स्पर्धेत बक्षिस प्राप्त झालेल्या संशोधक विद्यार्थी, शिक्षक व पदव्युत्तर विध्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. प्रा जे. टी. साळवे यांनी आभार मानले.

