1 min read

भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून
पाडळसरे धरणाच्या निधीसाठी धरणे आंदोलन

Loading

भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून
पाडळसरे धरणाच्या निधीसाठी धरणे आंदोलन

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या बांधकामाला सुमारे सोळा वर्षे झाली परंतु धरण अजुन 40 टक्के ही पूर्ण झालेले नाही. 141 कोटी किंमत असलेले धरण आज सुमारे 5000 कोटी झाले आहे हीच किंमत धरण पूर्ण होईपर्यंत सुमारे दहा हजार कोटीपर्यंत जाऊ शकते तसेच धरण पूर्ण व्हायला किती वर्ष लागतील याची शाश्वती नाही हे म्हणजे जनतेच्या पैशांची उधळपट्टी होय त्यामुळे जनतेत असंतोष पसरला आहे शासन लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अपयश आहे. सुमारे पाच लाख जनतेच्या पाण्याच्या प्रश्नाकडे तत्कालीन व विद्यमान खासदारांनी दुर्लक्ष केले आहे याचा आम्ही निषेध करतो तसेच या निवेदनाद्वारे विद्यमान खासदारांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करत आहोत जनतेने लोकप्रतिनिधींच्या कामांचे मूल्यमापन केले पाहिजे धरणाचे काम जलद गतीने पूर्ण झाले पाहिजे व पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे यासाठी हे धरणे आंदोलन केले उद्योग व शेतीला पाणी मिळाले तरच खऱ्या अर्थाने विकास होईल अमळनेर तालुका आवर्षण प्रवन असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते याची जाणीव होण्यासाठी धरणे आंदोलन केले परंतु वादळापूर्वीची शांत आहे असा इशारा या आंदोलनाद्वारे देण्यात आला यावेळी निवेदनावर प्रा अशोक पवार,संदीप घोरपडे,संदीप जैन, एस सी तेले, उमाकांत ठाकूर, शालीग्राम पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *