1 min read

आधार संस्थेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण महिलांसाठी बांबू पासून वस्तू बनवणे प्रशिक्षण संपन्न

Loading

आधार संस्थेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण महिलांसाठी बांबू पासून वस्तू बनवणे प्रशिक्षण संपन्न

अमळनेर:- आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या मार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत अंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील गरजू महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यात येत आहेत ,त्यात सात दिवसीय बांबू पासून शो वस्तू बनवणे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले ज्याकरिता प्रशिक्षक म्हणून श्रीमती मिनाक्षी वाळके, चंद्रपूर यांना बोलविण्यात आले होते द लेडी ऑफ बांबू म्हणून त्या प्रसिद्ध आहेत त्यांनी महिलांना बांबू पासून अतिशय कलात्मक पद्धतीने वस्तू बनवायला शिकविले, सात दिवसाचे बेसिक प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. ज्यात 34 बचत गटातील गरजू महिलांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले , कार्यक्रमात महिलांना विविध प्रकारचे कानातले रिंग्स , बांगडी, आकाश कंदील, नेकलेस, विविध प्रकारच्या राख्या, विविध शो वस्तू, शिकवण्यात आले. यानंतर काही निवडक महिलांना चंद्रपूर येथे पाठवून अडव्हांस प्रशिक्षण देखिल देण्यात येणार आहे असे डॉ. भारती पाटील यांनी महिलांशी संवाद साधतांना सागितले, या प्रशिक्षण, कार्यक्रम प्रसंगी बांबू विंग्स फाउंडेशन मोरफळ तालुका पारोळा येथील, संदीप महाजन, देवेंद्र नर्सरी चे उमेश सोनार, यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना बांबू विषयी महत्व पूर्ण माहिती दिली व मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे डॉ. भारती पाटील, अध्यक्ष आधार संस्था, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व महिलांसोबत चर्चा केली . तसेच श्रीमती रेणू प्रसाद, आधार संस्था कार्यकारी संचालक, यांनी महिलांशी संवाद साधून बांबू पासून बनवलेले वस्तू यांची पाहणी केली. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उमेद अभियानाच्या तालुका समन्वयक सीमा रगडे व ज्योती भावसार यांचे कार्यक्रम आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले आधार संस्थेचे प्रकल्प समन्वयक, मुरलीधर बिरारी यांनी सूत्रसंचालन केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिभा पाटील यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *