1 min read

कोळी समाजाच्या वतीने अमळनेरात रास्ता रोको आंदोलन

Loading

कोळी समाजाच्या वतीने अमळनेरात रास्ता रोको आंदोलन

अमळनेर प्रतिनिधी 

 कोळी समाजाचे जिल्हा अधिकारी जळगाव येथे १० ऑक्टोबर पासून  आपल्या विविध मागन्यांसाठी आंदोलन सुरु असून त्या आन्दोलनाची शासनाने दखल घ्यावी या मागणीसाठी अमळनेर येथील महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी महाराणा प्रताप चौक ते दगडी दरवाजा पर्यन्त तर धुळे रोड, कचेरी रोड पर्यन्त वाहनांच्या रांगा दिसत होत्या. आंदोलनात महिला व तरुणांची  संख्या लक्षणीय होती. टोकरे कोळी समाजाचे जिल्हा अधिकारी जळगाव येथे १० ऑक्टोबर पासून आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी या जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अमरण उपोषण सुरू आहे. तरीसुद्धा शासन संबंधित उपोषणकर्त्यांच्या मागणीकडे मुद्दामहून आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी, ढोर कोळी या जमातीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असून त्याचे संवैधानिक अधिकार मिळणे पासून वंचित ठेवत असल्यानच्या  निषेधार्थ अमळनेर येथे रास्ता रोको करण्यात आलेला आहे. त्यावेळी कोळी समाजाची समजूत काढण्यासाठी शासना तर्फे एस डी ओ सुनील नंदवाळकर हे आलेले होते. त्यावेळी एस डी पी ओ यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी कोळी समाजाचे भूषण कोळी, मनोज कोळी, जितेंद्र कोळी, गोपाल देवराज, राहुल येवडे ,सतीश कोळी,समाधान कोळी, महेंद्र कोळी ,सुनील कोळी, हर्षल कोळी,बापू कोळी, ताराचंद कोळी, ओम कोळी, हिरालाल कोळी, सुखदेव कोळी, महेंद्र कोळी, अक्षय कोळी, सुभाष कोळी, ज्ञानेश्वर कोळी, नामदेव कोळी,भूषण कोळी, राहुल कोळी, अजय कोळी, प्रवीण कोळी, विजय कोळी, किरण गंगाराम कोळी, भरत मोरे,उत्तम कोळी, खुशाल कोळी, रघुनाथ कोळी, मधुकर सोनवणे,संदीप कोळी, गोकुळ तायडे भगवान तायडे प्रकाश कोळी, प्रभाकर कोळी, दशरथ कोळी, चंद्रकांत कोळी, मणिलाल कोळी, किशोर कोळी, पुडलिक कोळी, वसंत कोळी, आकाश कोळी, राकेश कोळी, सुरेश कोळी उपस्थित होते. रास्ता रोको वेळी एपीआय हरिदास बोचरे,पीएसआय विकास शिरोडे, पोलिस कर्मचारी दिपक माळी, रवि पाटील, संजय पाटील, श्रीराम पाटील यांनी वाहतुक सुरळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *