1 min read

१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन द्या

Loading

१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन द्या

ओबीसी शिक्षक असोसिएशनचे काग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी-१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील बावीस हजार कर्मचारी पेंशनपिडीत आहेत. शासनाने २००५ नंतर पेंशन बंदचा अध्यादेश काढला यातील या कर्मचाऱ्यांचा काय दोष आहे.शासनाने टप्याटप्याने अनुदान दिल्यामुळे शासनाचा पैसा वाचवला ,कर्मचाऱ्यांना विनाअनुदानित काळातील सेवा वरीष्ठ, व निवड श्रेणीसाठी ग्राहय आहे .मग जुनी पेंशन का नाही अशा आशयाचे निवेदन ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या माध्यमातून अमळनेरला काग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले.
१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्ती व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांनी संगिताताई शिंदे व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलन केली.सत्ताधारी मुग गिळून गप्प बसले आहेत. पण येणाऱ्या २०२४ निवडणुकीत जे सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना देणार तेच सरकार सत्तेत येणार यासाठी पेंशन पिडीत कर्मचारी वर्ग एकजूट झाला आहे.दोन महीन्यात जुनी पेंशनचा प्रश्न सुटला नाही तर भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत जुनी पेंशनचा मुद्दा तीव्र होणार हे निश्चित आहे असे निवेदनात म्हटले आहे.
काग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की आम्ही पाच राज्यात काग्रेस पक्षाने जुनी पेंशन योजना लावली आहे.२०२४ मध्ये आमचे सरकार सत्तेत आले तर जुनी पेंशन कर्मचाऱ्यांना बहाल केली जाईल असे सांगितले.
यावेळी ओबीसी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष आर.जे.पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तूषार पाटील,
उच्च माध्यमिक संघटनेचे प्रा.हिरालाल पाटील, समता शिक्षक परीषदेचे अजय भामरे,बापूराव ठाकरे,कला अध्यापक संघटनेचे दिनेश पालवे,राहूल पाटील सह शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *