प्रताप महाविद्यालयात स्कूल ऑफ कॉमर्स व मॅनजमेण्ट सायन्सच्या वतीने उद्या राष्ट्रीय परिषद
![]()

प्रताप महाविद्यालयात स्कूल ऑफ कॉमर्स व मॅनजमेण्ट सायन्सच्या वतीने उद्या राष्ट्रीय परिषद
अमळनेर : खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे स्कूल ऑफ कॉमर्स व मॅनजमेण्ट अंतर्गत २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. स्कूल ऑफ कॉमर्स व मॅनेजमेंट सायन्सेसच्या परिषदेत एकूण १२४ शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. तसेच १५४ सादरीकरण होणार आहेत. या परिषदेला महाराष्ट्रासह भारतातील विविध विद्यापीठातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदरील परिषदेचे बीजभाषक डॉ. संदीप के.भट (प्राध्यापक आणि विभागप्रमुख पी. जी. विभाग बिझीनेस स्टडीझ, सरदार पटेल विद्यापीठ गुजरात) तसेच संसाधन व्यक्ती म्हणून डॉ. कामिनी शाह प्रा. पी. जी. विभाग, बिझीनेस स्टडीझ सरदार पटेल विद्यापीठ गुजरात) हे मान्यवर असणार आहेत. राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन श्री राणे सभागृहात संपन्न होणार आहे. परिषदेचे उद्घाटन सत्राचे उद्घाटक श्री. योगेश मुंदडे असतील तर अध्यक्ष म्हणून सीए नीरज अग्रवाल व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष श्री. जितेंद्र देशमुख, उपाध्यक्ष सौ. माधुरी पाटील, विश्वस्त सौ.वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, तसेच संचालक श्री. हरी भिका वाणी, डॉ. संदेश गुजराथी, कल्याण पाटील, विनोद पाटील, चिटणीस व प्राचार्य डॉ. ए.बी.जैन, खान्देश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील. मान्यवर संसाधन व्यक्तींचे लेक्चर व शोधनिबंध सादरीकरण दुपारच्या सत्रात संपन्न होणार आहे. तसेच समारोप सत्रासाठी प्राचार्य डॉ. ए.बी.जैन अध्यक्ष म्हणून व प्रमुख पाहुणे डॉ. संदेश गुजराथी असतील. तरी सर्वांनी परिषदेसाठी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी.जैन व खा.शि.मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच संयोजकांनी केले आहे.

