1 min read

शक्तीच्या पाठिंब्यामुळे आपण पुढे जात असतो- डॉ. मनीलाल शिंपी
अष्टमीच्या दिवशी तुमच्यासारख्या नवदुर्गांचा
सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले- डॉ.किशोर पाटील

Loading

स्त्रि शक्तीच्या पाठिंब्यामुळे आपण पुढे जात असतो- डॉ. मनीलाल शिंपी
अष्टमीच्या दिवशी तुमच्यासारख्या नवदुर्गांचा
सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले- डॉ.किशोर पाटील
ग्रामपंचायत पिंपळास येथील आदिवासी पाड्यात आदिवासी महिलांना साडी वाटप कार्यक्रम संपन्न!
ठाणे,कल्याण दि.२३(प्रतिनिधी)
मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग,
स्वराज्य तोरण चारिटेबल ट्रस्ट,
लेडीज एक्सप्रेस ग्रुप, सुंदर कांड महिला मंडळ, स्वामीनारायण ट्रस्ट, चंद्रानंद कृषी पणन व समाज कल्याण संस्था, व समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रामपंचायत पिंपळास आयोजित आदिवासी पाडा येथे नवरात्र उत्सवानिमित्ताने साडी वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार सदर कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागाचे सचिव डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील, लेडीज एक्स्प्रेस च्या प्रमुख श्रीमती मधुबेन ठक्कर, सुंदरकांड मंडळाच्या प्रमुख श्रीमती ज्योती पुजारा,
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी शहराध्यक्ष आचार्य श्री.सुरजपाल यादव, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी ग्रामीण अध्यक्ष तथा पोलीस पाटील संघटनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष श्री. सोमनाथ बाळाराम ठाकरे, तेलुगु समाज भिवंडी शहराचे शहराध्यक्ष तथा कोमल समाचार चे संपादक श्री श्रीनिवास सिरीमल्ले, लोक हिंद न्यूज चे सहसंपादक श्री. जगदीश पताळे,श्री.जगदीश राजाराम भोईर (उपसरपंच ग्रामपंचायत पिंपळास)
श्री. विशाल बंडू पाटील (माजी सरपंच व विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पिंपळास)
श्री. विशाल गरुडे( सदस्य ग्रामपंचायत पिंपळास)
श्री. काळीराम भोईर समाजसेवक
श्री. सन्नी प्रभाकर भोईर (उपविभाग प्रमुख शिवसेना)
श्री. पंडित गरुडे, श्री. काळीराम गरठा, श्री. संजय तांडेल,श्री. विकास पडवले, आदी मान्यवर व आदिवासी भागातील सर्व नवदुर्गा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.नवरात्र उत्सव निमित्ताने, अष्टमीच्या दिवशी “दुर्गा पूजा”म्हणून मजुरी करणाऱ्या नवदुर्गांना साडी भेट देण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग यांच्या प्रयत्नाने व उपसरपंच जगदीश भोईर यांच्या विशेष सहकार्याने पिंपळास आदिवासी पाडा येथे साडी वाटप कार्यक्रम रविवार दिनांक २२/१०/२०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अनेक स्तुत्य उपक्रम राबवत असतो, यासाठी आम्हाला वेगवेगळ्या संस्था मदत करत असतात व त्यामुळेच आम्ही असे उपक्रम पोस्टमनची भूमिका घेऊन करत असतो, नवरंगांचा हा नवरात्र उत्सव आपण रोज पाहत आलो आहोत, मात्र या नवरात्री उत्सवानिमित्ताने स्त्रि शक्ती आनंदाने उत्साहात सहभागी होते, व त्यांच्या पाठबळामुळे आपण पुढे जात असतो असे यावेळी आर एस पी कमांडर डॉ.श्री.मनिलाल शिंपी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या व दसऱ्याच्या आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो, ग्रामपंचायत पिंपळास चे नवनिर्वाचित उपसरपंच श्री जगदीश राजाराम भोईर यांनी आपल्याला या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने व त्यांच्या सर्व सन्माननीय सभासद यांच्याकडून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले त्यामुळे त्यांचे आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने आम्ही आभार मानतो कारण त्यांच्यामुळे आम्हाला अष्टमीच्या दिवशी तुमच्यासारख्या नवदुर्गांचा
सन्मान करण्याचे भाग्य मिळाले असे दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागीय सचिव,डॉ. किशोर बळीराम पाटील
यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सन्नी प्रभाकर भोईर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच श्री. जगदीश भोईर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *