1 min read

मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर.संजय पाटील यांची अध्यक्षपदी निवड

Loading

मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर.

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्री. मनोहर देसाई हे सेवा निवृत्त होत असल्याने व कार्यकाळ पूर्ण झाल्याने मुख्याध्यापक संघटनेची अनुयोग विद्यालय खार पूर्व येथे श्री. मनोहर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा पार पडली.या सभेत नवीन कार्यकारिणी निवड करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला
व नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे नवीन अध्यक्ष म्हणून
श्री. संजय पाटील विद्याभूषण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दहिसर पूर्व मुंबई यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष श्री. जयसिंग कदम
सचिव सौ. विणा दोनवलकर, सह सचिव श्री. अनिल सिंग, खजिनदार श्री. आशीर्वाद लोखंडे
विद्या सचिव श्री. राजन महाडेश्वर तसेच नवीन कार्यकारिणी सदस्य म्हणून
श्री खेंडकर बी बी
श्री रमाकांत सरोज
श्री गणेश कांबळे
श्री नामदेवराव ढवळे
श्री पांडुरंग हिवाळे
श्री संजय सिंग
सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदस्य
श्री शंकर पवार
श्री मनोहर देसाई
श्री स्वप्नाली ठाकरे

सन्माननीय मार्गदर्शक माजी अध्यक्ष
श्री रमाकांत पांडे
श्री सतिश चिंदरकर
श्री मंजूर अहमद
सौ.दिलशाद थोबानी
अशी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली
कार्यकारिणी निवड प्रक्रिया उत्कृष्टपणे व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांचे हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गोविंदराजन श्रीनिवासन सरांनी अभिनंदन केले व त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *