नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ मतदान नोंदणी शंभर टक्के करूया –तुळशीराम सोनवणे
![]()
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ मतदान नोंदणी शंभर टक्के करूया – श्री तुळशीराम सोनवणे
नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या विभागात 30 सप्टेंबर 2023 पासून शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी सुरू झाली आहे.त्यानुसार प्रत्येक तालुक्यात मतदान नोंदणी सुरू आहे . शिक्षक मतदार संघ नाव नोंदणीसाठी माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन प्राध्यापक/ प्राचार्य, मेडिकल कॉलेज व इंजिनिअरिंग कॉलेज मधील प्राध्यापक/ प्राचार्य तसेच माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेली व लगतच्या सहा वर्षांमध्ये तीन वर्ष सलग शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक /प्राध्यापक नोंदणी करू शकतात. मतदार नोंदणीसाठी फॉर्म नमुना 19 चा छापील अर्ज सोबत संस्था प्रमाणपत्र एक फोटो, आधार कार्ड, मतदान कार्ड, मुख्याध्यापकाच्या सही, शिक्क्याने प्रमाणित करून तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी (बीआरसी) मार्फत तहसील कार्यालयात 6नोव्हेंबर 2023 पूर्वी जमा करावे असे जाहीर आवाहन “शिक्षक समन्वय समिती” (परिवर्तन पॅनल) च्या वतीने श्री तुळशीराम सोनवणे (संचालक जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सह. पतपेढी मर्या.भुसावळ) यांनी केले.


