1 min read

अमळनेर तालुक्यातील जि प प्राथमीक शाळांमध्ये दहा दिवस गणितासाठी उपक्रम संपन्न

Loading

अमळनेर तालुक्यातील जि प प्राथमीक शाळांमध्ये दहा दिवस गणितासाठी उपक्रम संपन्न

निपुण भारत अभियान अंतर्गत अंमळनेर तालुक्यातील 133 शाळा व नपाच्या च्या सहा शाळांमध्ये 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर पर्यंत इयत्ता पहिली ते सातवीच्या मुला मुलींसाठी उपक्रम संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील जि प प्राथमीक शाळांमध्ये दहा दिवस गणितासाठी उपक्रम निपुण भारत अभियान अंतर्गत अंमळनेर तालुक्यातील 133 शाळा व नपाच्या च्या सहा शाळांमध्ये 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर पर्यंत इयत्ता पहिली ते सातवीच्या मुला मुलींसाठी दहा दिवस गणितासाठी उपक्रम राबविण्यात आला. सदरचा कार्यक्रम राबविण्याची संकल्पना मा.जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.अंकित पन्नू यांनी दिली होती.
निपुण भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून २०२५ पर्यंत जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील वाडी वस्त्यावर शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी आवड निर्माण व्हावी गणित विषयाची भीती नष्ट व्हावी त्यांची गणित विषयातील शैक्षणिक कौशल्य व क्षमतांची वृद्धी व्हावी. कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी अमळनेर तालुक्यात गटशिक्षणाधिकारी मा.श्री.रावसाहेब मांगो पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व विषय तज्ञ व विशेष शिक्षक, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सामुहिक रित्या प्रयत्न करून शैक्षणिक साहित्यांचा वापर करून शासनाने पुरविलेल्या गणित पेटीतील साहित्याचा प्रभावी वापर करून नाविन्यपूर्ण उपक्रम गणनपूर्व तयारी, संख्याज्ञान, संख्यावरील क्रियांचा सराव, कृतियुक्त पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शैक्षणिक साधनांचा वापर करून गणित रंजक पद्धतीने व विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेवून शिक्षकांना पूरक अधिकच्या कृतींची मुभा देण्यात आली होती.
शिक्षकांनी आनंदायी कृतींचा गणितीय खेळांचा परिसरातील व शाळेत उपलब्ध साहित्याचा यथायोग्य वापर करून गणितीय संकल्पनाचे आकलन होईल व जेणेकरून विद्यार्थ्यात गणिताची आवड निर्माण होईल असे प्रभावी अध्यापन करीत आज २१ ऑक्टोबर रोजी या १० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचे फलित म्हणून इ.१ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांच्या गणनपूर्व स्थिती, संख्या ज्ञान ,बेरीज, वजाबाकी गुणाकार व भागाकार या पायाभूत क्षमता प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांची अध्यनस्तर निश्चिती चाचणी घेण्यात आली. त्यात अमळनेर तालुक्यात इ.१ली ते ७वी पर्यत एकूण 9466 विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती चाचणी घेतली असता संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी ,गुणाकार व भागाकार या क्रियांमध्ये पूर्वस्थिती पेक्षा आजच्या स्थितीत चाचणी वरून या उपक्रमामुळे सरासरी 14.28% ने वाढ झालेली आढळली .
*पंचायत समितीस्तरावर २१ ऑक्टोबर रोजी मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृतकलश सुपूर्त करण्याच्या कार्यक्रम प्रसंगी मा.ना.अनिल पाटील (आपत्ती,मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य.) यांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हे मा.गटविकास अधिकारी श्री.सुशांत पाटील साहेब गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील, सर्व विस्तार अधिकारी सर्व केंद्र प्रमुख व विषय तज्ञ व विशेष शिक्षक यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *