1 min read

जीवनात कुणालाही कमी लेखू नका.
तहसीलदार नामदेव पाटील

Loading

जीवनात कुणालाही कमी लेखू नका.
तहसीलदार नामदेव पाटील

शिक्षण हे आपल्या साऱ्या अडचणीवर अडचणीवर व दुःखावर उपाय असून जीवनामध्ये आपण स्वतःला व इतरांना देखील कमी लेखू नका आत्मविश्वास आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची शिक्षणाच्या माध्यमातून येणारी ताकद हीच आपली बलस्थान असल्याचे मत जळगाव तालुक्याचे तहसीलदार मा. श्री नामदेव पाटील यांनी सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे शारदोत्सवाचे तृतीय पुष्प गुंफितांना विद्यार्थ्यांशी गोष्टी रूपाने संवाद साधताना व्यक्त केले.ते पुढे म्हणाले ,आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. कुटुंबाला प्राधान्य देणे, मूलभूत गरजांना प्राधान्य देणे, आपण कितीही मोठे झालो तरी मित्रांसाठी वेळ काढला पाहिजे, विद्यार्थ्यांचे काम अभ्यास करणे आहे, अभ्यास म्हणजे घोकम्पट्टी नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही अद्वितीय आहेत. तुमच्यासारखे दुसरे कोणीच नाही, आपण स्वतःवर आत्मविश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी तत्त्वज्ञानाचे जीवनात महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांना सांगितले की अभ्यासामध्ये सातत्य ठेवले पाहिजे, रोज वेळेचे नियोजन करून अभ्यास करीत राहणे, जीवनात चिकाटी ही फार महत्त्वाची आहे, तसेच जीवनात सहकार्याची भावना असणे हे फार महत्त्वाचे आहेत. सहकार्य मुळे एकमेकांचे कार्य सोपे होतात असेही त्यांनी याप्रसंगी मांडले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेमलता सोळुंके विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल,पर्यवेक्षक एल. जे. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख के. बी. तायडे, डी. जी. महाजन, एल. जे. भुगवड्या उपस्थित होते. भूपाळी -छाया सोनवणे, गायत्री पाटील, दिव्या सूर्यवंशी, अमृता सोनवणे ईशस्तवन – प्रतीक्षा कोळी, शितल चव्हाण, प्रांजल अहिरे स्वागत गीत- पोर्णिमा निकम, जयश्री माळी, लक्ष्मी सोनार जोगवा- रिद्धी माळी, छाया, अमृता, गायत्री, दिव्या. प्रमुख अतिथींचा परिचय- एल. जे. भुगवड्या सर यांनी करून दिला. सूत्रसंचालन- भाग्यश्री कोळी. आभार प्रदर्शन- कुंदन वाणी हिने केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भावना चौधरी, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व दहावी क च्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *