1 min read

डॉ कलाम यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी…
मुख्याध्यापक अनिल महाजन

Loading

डॉ कलाम यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी…
मुख्याध्यापक अनिल महाजन

वाचन प्रेरणा दिनानिमित्त देवगांव देवळी हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धाचे आयोजन

निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मान

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
डॉ. कलाम यांच्या मते, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी, आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा.
भारतातील युवा शक्तीमुळे भारत देश महासत्ता बनणार, यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव ता.अमळनेर येथील शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन मार्गदर्शन प्रसंगी बोलत होते….

वाचन प्रेरणा दिनानिमित्त
शाळेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले निबंध स्पर्धेत ३० विद्यार्थी सहभागी झाले… त्यात सात उत्कृष्ट विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख आय.आर.महाजन यांच्या कडून बक्षिसे देण्यात आली.परीक्षक म्हणून मराठीचे शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले..
निबंध स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.
प्रथम श्वेता गौतम बैसाणे इयत्ता दहावी
द्वितीय-गिरीजा सुनील माळी आठवी
तृतीय-रागिणी विनायक पाटील नववी
उत्तेजनार्थ-वैष्णवी भरत पाटील आठवी
वैष्णवी श्याम पाटील आठवी
मयुरी आधार महाजन नववी
मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले..कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आय.आर.महाजन यांनी केले तर आभार एस.के.महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के, शिक्षकेत्तर कर्मचारी एन.जी.देशमुख, संभाजीराव पाटील, गुरूदास पाटील यांनी प्रयत्न केले..

निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करताना शिक्षक वृंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *