राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्षपदी भूषण भदाणे
![]()

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्षपदी भूषण भदाणे
अमळनेर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी अजित पवार यांनी सक्रिय आणि क्रियाशील कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये संधी उपलब्ध करणे सुरू केले आहे. यामुळे पक्ष संघटना मजबूत होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी धाडसी अनेकवेळा आंदोलने करून न्याय मिळवून देण्याच्या कार्यामुळे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी भूषण भदाणे यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे मंत्री अनिल पाटील , औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे , माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील , रा कॉ चे प्रदेश सरचिटणीस ईशाद जहागीरदार यांनी स्वागत केले आहे.

