1 min read

जिल्हा निवृत्त कर्मचारी सेवा संघाची वार्षिक सभा संपन्न.

Loading

जिल्हा निवृत्त कर्मचारी सेवा संघाची वार्षिक सभा संपन्न.
अमळनेर: अमळनेर तालुका निवृत्त सेवा संघाची ४१वी वार्षिक सभा साने गुरुजी हॉलमध्ये जिल्हाध्यक्ष तथा नाशिक विभागीय उपाध्यक्ष म.पे.अ पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष श्री हिंमतराव मुकुंदा पाटील यांनी प्रास्ताविक केले, सचिव भालचंद्र खंडेराय यांनी अंदाजपत्रक इतिवृत्त सादर केले. तालुक्यातील राज्य व जिल्हा परिषद आदर्श शिक्षकाचा ८०वर्षे वयापुढील ज्येष्ठ नागरिक अन्नदात्या श्रीमती निलिमा भिका पाटील तसेच विविध तालुक्यातील मान्यवरांचा सत्कार झाला उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष सदाभाऊ सोनवणे यांनी संघटनेचे कार्य सांगून मनोगत व्यक्त केले, त्यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवले, जिल्हाभरातील निवृत्त शिक्षकांच्या राहिलेला आर्थिक प्रश्न लवकरच खाती जमा होईल असे आश्वासन दिले. या सभेस अडीचशेहुन अधिक निवृत्ती कर्मचारी उपस्थित होते. सदर सभेसाठी विद्यमान कार्यकारी मंडळाने अधिक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वसुंधरा लांडगे यांनी केले तर आभार चिंधू वानखेडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *