1 min read

माध्यमिक विद्यालय शिंदी येथे बालविवाह प्रतीज्ञा संपन्न.

Loading

माध्यमिक विद्यालय शिंदी येथे बालविवाह प्रतीज्ञा संपन्न.
भडगाव प्रतिनिधी(पक्षीमित्र अश्विन पाटील)

कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी, पाटील किसान शिक्षण संस्था संचलित,माध्यमिक विद्यालय शिंदी येथे जळगाव जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा व्हावा या साठी महिला व बालकल्याण विभाग आणि शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक यांचे मार्फत जिल्हयातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये, महिला व बालकल्याण विभागामार्फत सर्व अंगणवाडीमध्ये दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत बालविवाह निर्मुलन प्रतिज्ञा व हुंडा प्रतिबंध प्रतिज्ञा घेऊन जनजागृती करायचे निर्देश मा.जिल्हाधिकारी सो. जळगाव यांनी दिले असून त्या अनुषंगाने माध्यमिक विद्यालय शिंदी येथे बालविवाह प्रतीज्ञा प्रार्थने वेळी घेण्यात आली.
सदर प्रतीज्ञा वेळी शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब श्री.आर.डी.महाजन सर व सर्व शिक्षक बंधू भगीनी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *