1 min read

शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी व प्राथमिक शिक्षक दिलीप सोनुने यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याचा जाहीर निषेध करत गटशिक्षणाधिकारी यांना संघटनेच्या पदाधिकां-चे निवेदन

Loading

शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी व प्राथमिक शिक्षक दिलीप सोनुने यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याचा जाहीर निषेध करत गटशिक्षणाधिकारी यांना संघटनेच्या पदाधिकां-चे निवेदन

अमळनेर प्रतिनिधी
शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी व प्राथमिक शिक्षक दिलीप सोनुनेे सर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा जाहीर निषेध म्हणून अमळनेर तालुका प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संघटना तसेच शिक्षण प्रेमी यांच्याकडून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला .भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी सरकारने योग्य दक्षता घ्यावी .सदर घटनेतील आरोपींना ताबडतोब अटक करून कडक कारवाई करावी यासाठी अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी टिडीएफ संघटनेचे उमेश काटे यांनी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करत आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी सांगितले की आपल्या भावना शासन दरबारी कळविल्या जातील व झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रताप महाविद्यालयाचे माजी उपप्रचार्य डॉ एस.ओ. माळी, मनोहर नेरकर,डी.ए धनगर, डाँ कुणाल पवार, निरंजन पेंढारे, उमेश काटे, गोपाल हडपे, विशाल देशमुख ,जयेश काटे ,अशोक पाटील, दत्तात्रय सोनवणे ,सुनील जाधव, ईश्वर महाजन, जे.डी अहिरे, अशोक ईसे,शरद पाटील सह शिवशाही फाऊंडेशन, अमळनेर,माजी प्रतापियन्स प्रबोधिनी, अमळनेर,साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच, अमळनेर,खान्देश साहित्य संघ, अमळनेर शाखा,ओबीसी शिक्षक असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *