1 min read

दहावी – बारावी परीक्षा संदर्भात
नव्या शैक्षणिक धोरणत महत्वपूर्ण निर्णय.

Loading

दहावी – बारावी परीक्षा संदर्भात
नव्या शैक्षणिक धोरणत महत्वपूर्ण निर्णय.

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

नव्या शैक्षणिक धोरणच्या अंमलबजावणी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपक केसरकर यांनी नव्या शैक्षणिक धोरणच्या अंमलबजावणी संबंधित यंत्रणेलाही सुचना दिलेल्या आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत दहावी व बारावीच्या परीक्षा या शैक्षणिक वर्षांत दोन वेळा घेण्याची सुचना दिली होती. परंतु यातून विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा देणे बंधनकारक नसणार, असे विधान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.

दोनवेळा परीक्षा देणे हे सक्तीचे नसणार.विद्यार्थी फक्त एकदाच बोर्डाच्या परीक्षेला बसू शकतात. विद्यार्थ्यांमध्ये एकाच संधीच्या भीतीमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी वर्षातून दोनदा परीक्षा म्हणजे प्रीबोर्ड आणि बोर्ड परीक्षा घेतली जाईल.पण सर्व विद्यार्थ्यांसाठी ते बंधनकारक नसेल असे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. परीक्षेसाठी मी पूर्णपणे तयार आहे, असे विद्यार्थ्याला वाटत असेल आणि परीक्षेच्या पहिल्या ‘सेट’ मध्ये मिळालेल्या गुणांवर तो समाधानी असेल, तर तो पुढील परीक्षेत न बसण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराजन श्रीनिवासन सरांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *