1 min read

उल्हासनगर येथील जनसेवक डॉ.प्रा.प्रकाश माळी सर यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा……

Loading

उल्हासनगर येथील जनसेवक डॉ.प्रा.प्रकाश माळी सर यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा……
मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी : भुषण महाजन
उल्हासनगर येथील लोकसेवक, मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष व जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सी चे कौन्सिल सदस्य एनसीएफ डॉ.प्रा. प्रकाश माळी सर व त्यांची नात कु. रिशिका(परू) जितेंद्र माळी यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त परिसरातील तीन विधवा भगिनींना व एका गरजू भगिनीला जीवनावश्यक वस्तू सौ. रजनी प्रकाश माळी यांच्या हस्ते देण्यात आल्या तसेच एका दिव्यांग विधवा भगिनीला जीवनावश्यक वस्तुंसोबत साडी चोळीचा आहेर करण्यात आला.
त्याचप्रमाणे अंबरनाथ एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत चालणाऱ्या अंगणवाडीमधील मुलांना जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सी चे उपाध्यक्ष एनसीएफ योगेंद्र डोळस यांच्या हस्ते फळं वाटप करण्यात आली व कैलाश कॉलोनी, उल्हासनगर-५ येथील जायंटस भोजनालयास ३० किलो तांदूळ एनसीएफ योगेंद्र डोळस यांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी काकाश्री शिवनाथ पाल व अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *