बिजासनी घाटात दरोडेखोरांकडून ट्रॅव्हल प्रवाशी गाडीवर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न असफल, मात्र हल्यात बसचालक व कंडक्टर गंभीर जखमी! आर एस पी अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी यांच्या सह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची कौतकास्पद कामगिरी..
![]()

बिजासनी घाटात दरोडेखोरांकडून ट्रॅव्हल प्रवाशी गाडीवर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न असफल, मात्र हल्यात बसचालक व कंडक्टर गंभीर जखमी! आर एस पी अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी यांच्या सह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची कौतकास्पद कामगिरी..
शिरपूर दि.८(प्रतिनिधी)
शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इंदोर येथून मां. भुवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सन्मान सत्कार सोहळ्याचे प्रमुख म्हणून डॉ. मनिलाल शिंपी,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.किशोर बळीराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी चे सचिव डॉ.यशवंत म्हात्रे, डॉ. ॲड.के. डी.पाटील, यांच्यासह राजमंदिर या खाजगी ट्रॅव्हलस् बस क्रमांक MP:10:P:1881 मधून परतीचा प्रवास करत असताना,मध्यप्रदेशातील सेंधवा जवळील बिजासनी घाटात रात्री ३.०० वा. व पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी अचानक दगडफेक करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, गाडीची पुढील काच जोरात फुटली, आणि बसचालक मुर्तुजा अली,आणि कंडक्टर याला गंभीर जखम झाली. यावेळी आर एस पी अधिकारी, व मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या ग्रूपचे प्रमुख, डॉ. मनिलाल शिंपी यांनी प्रसंगावधान ओळखून ड्रायव्हर ला हिम्मत देत गाडी सुरू ठेवण्यास सांगितले.आणि कंडक्टरची कानाखालील नस काचेमुळे तुटली होती,खूप रक्तस्राव होत होता. त्या ठिकाणी मोठ्या कपड्याने घट्ट बाधून त्यांना धीर देत गाडी न थांबवता पुढे नेली. मागून दगडफेक व आरोळ्या मारीत दरोडेखोरांनी थोड्या दूर पर्यंत पाठलाग केला. व हल्लेखोर,दरोडेखोर अखेर पळाले,आणि दरोखोरांचा हल्ला असफल ठरवला. सेंधवा या ठिकाणी उपचार न होऊ शकल्यामुळे भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे आणि दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, यांच्या सहकार्याने कंडक्टर व ड्रायव्हर मुर्तूजा अली यास शिरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. व दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांचा प्रयत्न असफल ठरवत मोठा अनर्थ टाळून बस मधील सर्वांचे प्राण वाचवले.

