आदर्श विद्यालय अमळगाव येथील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत सुयश….
![]()

आदर्श विद्यालय अमळगाव येथील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत सुयश….
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित आदर्श विद्यालय अमळगाव येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या अमळनेर तालुकास्तरावरील मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळविले. यात 14 वर्षे आतील वयोगटात 600 मीटर धावणे (रनिंग) स्पर्धेत इ. 8 वीची विद्यार्थीनी कु. गायत्री सतीश चौधरी हिने प्रथम क्रमांक मिळविला असून तिची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच 1500 मीटर धावणे (रनिंग) या स्पर्धेत इ. 10 वीचा विद्यार्थी भावेश नाना पारधी व इ. 9 वीचा विद्यार्थी रोहित प्रवीण सोनवणे यांनी देखील घवघवीत यश मिळविले असून या दोघांची देखील जिल्हास्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षक श्री. विनय सोनवणे व मुख्याध्यापक श्री.आर.यू.पाटीलसर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे मानद सचिव व संचालक मंडळातील सर्व पदाधिकारी व अमळगाव येथील तीनही विभागाचे स्कूल कमिटी चेअरमन यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

