1 min read

दहा मुलांना चंद्रज्योत झाडाच्या बिया खाल्ल्याने झाली विषबाधा,ग्रामीण रुग्णालयात दाखल,
मंत्री अनिल पाटील यांनी केली चौकशी

Loading

दहा मुलांना चंद्रज्योत झाडाच्या बिया खाल्ल्याने झाली विषबाधा,ग्रामीण रुग्णालयात दाखल,
मंत्री अनिल पाटील यांनी केली चौकशी

अमळनेर प्रतिनिधी
चंद्रजोत झाडाच्या बिया खाल्याने विषबाधा झाल्याच्या घटनेवर पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील हे लक्ष ठेवून आहेत, मुलांच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. मुलांची प्रकृती स्थिर असली तरीही सावधानतेचा अतिरिक्त उपाय म्हणून बालरोगतज्ज्ञ यांचे पथक अमळनेर उपजिल्हा रुग्णालयात पाठविणेत आले आहे.
ग्रामविकास मंत्री ना. श्री. गिरीश महाजन यांनी दूरध्वनी द्वारे घटनेची माहिती जिल्हाधिकारी यांचेकडून जाणून घेतली. विषबाधेचे कारण निश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक संबंधित गावात पाठविणेचे ग्रामविकास मंत्री यांनी निर्देश दिले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. श्री. अनिल पाटील हे ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या संपर्कात असून मुलांच्या प्रकृती बाबत माहिती घेत आहेत, पुन्हा अशी घटना न घडण्याचे दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

नामदार अनिल पाटील यांनी केली चौकशी गांधली येथील घटनेची माहिती मिळताच मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी तात्काळ ग्रामिण रुग्णालयातील डॉक्टरांना तातडीने उपचार करण्याच्या सूचना केल्या तसेच नातेवाईकांना देखील फोन करून धीर दिल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष् प्रसाद यांचेशी संवाद साधत जिल्हा स्तरावरून बालरुग्ण डॉक्टरांची टीम पाठविण्याच्या सूचना केल्याने तातडीने टीम रवाना करण्यात आली.बक्षितांश मुलांची प्रकृती स्थिर असल्याने मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *