प्रताप महाविद्यालयाच्या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे बक्षीस
![]()

प्रताप महाविद्यालयाच्या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे बक्षीस
पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत प्रतापला घवघवीत यश
कलोपासक पुणे व देवगिरी महाविद्यालय, छ.संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान छ.संभाजीनगर येथे पार पडलेल्या व महाराष्ट्रातील अत्यंत मानाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘तो, पाऊस आणि टाफेटा’ ही एकांकिका सादर केली. या एकांकिकेची सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका (बक्षीस स्वरुप रोख रक्कम ५००० रुपये, फिरता चषक व प्रमाणपत्र) म्हणून निवड झाली. तसेच संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्याचे महत्वाचे बक्षीस अक्षय ठाकरे या विद्यार्थ्याने पटकावले. मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्याचे बक्षीस मिळवून मयुरी धनगर या विद्यार्थिनीने प्रताप महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातली. या सर्व बक्षिसांच्या बळावर महाविद्यालयाच्या संघाची महाअंतिम फेरीत निवड झाली. या संघात एकूण १४ विद्यार्थ्यांचा समावेश असून महाविद्यालयाचा संघ डिसेंबर महिन्यात पुणे येथे आपली एकांकिका सादर करणार आहे.
संघातील विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे,कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, खान्देश शिक्षण मंडळाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष व संचालक सीए नीरज अग्रवाल तसेच सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.ए.बी. जैन, संस्थेचे चिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.एच.निकुंभ, डॉ.जे.बी पटवर्धन, प्रा.डॉ.कल्पना पाटील, प्रा.पराग पाटील, प्रा.डॉ. विजय मांटे, यांनी संघातील विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संघव्यवस्थापक डॉ. हेमंत पवार व समिती सदस्य डॉ.नलिनी पाटील, प्रा.योगेश पाटील, प्रा.महेंद्र महाजन तसेच प्रा.नितीन पाटील प्रा.डॉ.संदीप नेरकर डॉ.योगेश तोरवणे यांनी मार्गदर्शन केले.

