1 min read

प्रतापच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

Loading

प्रतापच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयातील विशाल पाटील आणि भाग्यश्री देशमुख या बुद्धिबळ खेळाडूंनी चमक दाखविली. धनदाई महाविद्यालयामध्ये दि. ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागद्वारा आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत प्रताप महाविद्यातील विशाल पाटील आणि भाग्यश्री देशमुख यांनी विजय मिळवला. पुढील विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली. या कामगिरीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सर्व संचालक मंडळ, संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. अरुण जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, सर्व उपप्राचार्य, जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. संदीप नेरकर, वरिष्ठ क्रीडा प्रमुख डॉ. सचिन पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडू यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *