मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली येथे जिल्हास्तरीय योगा स्पर्धा संपन्न
![]()



मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली येथे जिल्हास्तरीय योगा स्पर्धा संपन्न
ठाणे,कल्याण:( मनिलाल शिंपी):कल्याण डोंबिवली म.न.पा. आयोजित आणि बृहन ठाणे योग असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय योग स्पर्धा (U 14, 17, 19 Boys & Girls) मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली (पूर्व) येथे ५०० स्पर्धकांच्या विक्रमी सहभागाने संपन्न झाली.
स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या H.M. अनिता मुलकी मॅडम आणि ए.एच.एम. शीला मॅडम यांच्या हस्ते झाले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खेळ प्रमुख सुनील पाटील, स्पर्धा नियंत्रक कृष्णा माळी, कृष्णा बनगर, श्री. दिनेश पवार, शाळेचे पर्यवेक्षक श्री. जगताप सर, मेघा परब मॅडम यांनी सर्वोतोपरी सहकार्य केले.
५०० स्पर्धकांचे परीक्षण करण्यासाठी श्र्वेताली पाटील, मिनल जोशी, सुजाता धांडे, वीणा निमकर, भारती नरे, डिम्पल मॅडम,रविंद्र पाटील, श्री. राकेश मळेकर आणि इतर पंचांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
संतोष मलबारी
सेक्रेटरी, बृहन ठाणे योग असोसिएशन यांनी अगदी नियमबद्ध सर्व स्पर्धा घेतल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले. मॉडेल इंग्लिश स्कूल चे एज्युकेशन चे सेक्रेटरी यांचा हस्ते दीपप्रज्वलन करून योगा स्पर्धेला सुरवात करण्यात आली. सर्व खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका अनिता मुलगी यांनीही स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आणि योग स्पर्धा ही फक्त स्पर्धा नसून ही आपल्याला आयुष्यभर शारीरिक मानसिक आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा आपण करत राहवे अश्या शब्दात शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी उपस्थित सर्व क्रिडा संघटक,क्रीडा शिक्षक, खेळाडू ,आणि मान्यवरांचे अशोक जगताप यांनी विशेष आभार मानले यावेळी स्वामी विवेकानंदाचे रवींद्र पवार, लजपत जाधव, तरे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. सुनिल पाटील यांनी संपूर्ण स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन उत्कृष्टपणे केले. केली स्पर्धेचे सूत्रसंचलन मॉडेल इंग्लिश स्कूलचे सुनिल पाटील यांनी केले.कृष्णा बंनगर यांनी स्पर्धेचे मूल्यांकन,आणि गुणांकन करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.

