देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने अभिवादन
![]()
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने अभिवादन
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण बाबत व
बालविवाह प्रतिबंध याबाबत विद्यार्थ्यांना दिली शपथ



अमळनेर प्रतिनिधी- देवगाव देवळी तालुका अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये 2 ऑक्टोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले व शाळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा बाबत व बालविवाह प्रतिबंधक कायदा याबाबत प्रतिज्ञा देण्यात आली.
सविस्तर माहिती अशी कि
राज्यभरात ०२ ऑक्टोंबर २०२३ रोजी “महात्मा गांधी जयंती निमित्त तंबाखू मुक्तीची “शपथ घेणेबाबत.उपरोक्त संदर्भीय विषयानुसार, राज्यांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे
राबविण्यात येत आहे. दि. ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी “महात्मा गांधी जयंती निमित्त तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली.
सन २०१६-१७ पासून संपूर्ण राज्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत हे. या कार्यक्रमाबाबत जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.
धूम्रपान करणारे व धूम्रपान न करणारे यांना तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती व परिसर स्वच्छतेवर नियंत्रण आणण्यास मदत होईल. राज्यात धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण हे इतर राज्यांच्या तुलनेत कमी असले तरी धूरविरहित (Chewing
Tobacco) तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त आहे. व हुंडा प्रतिबंधक कायदा याबाबत जनजागृती पर मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले.
शाळेचे सांस्कृतीक विभाग प्रमुख ईश्वर महाजन यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त कायदा व हुंडा प्रतिबंध कायदा याबाबत जनजागृती प्रतिज्ञा दिली..
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आय आर महाजन, एस के.महाजन , एच.ओ.माळी,एन.जी.देशमुख होते. अगोदर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले..
यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले…

