अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्हाचे 2 ऑक्टोबरला अनावरण
![]()
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्हाचे 2 ऑक्टोबरला अनावरण
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू करणार संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी मंडळ अंमळनेर आयोजित 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संमेलनाच्या बोधचिन्हाचे आनावरण बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ व्हि.एल माहेश्वरी यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंत्री अनिलदादा पाटील भूषविणार आहेत. विशेष उपस्थिती डॉक्टर अनिल शिंदे कार्याध्यक्ष खाशी मंडळ अमळनेर, तर प्रमुख पाहुणे माननीय आमदार डॉ बी एस पाटील, मा. आमदार शिरीष चौधरी,मा.आ. साहेबरावदादा पाटील. मा.आ.स्मिताताई वाघ उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2023 वेळ सकाळी साडेदहा वाजता बन्सीलाल पॅलेस प्रताप मिल कंपाऊंडमध्ये येथे होणार आहे तरी सर्वांनी कार्यक्रमास सर्व अमळनेर शहरातील वाचनप्रेमी,साहित्यिक,शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील नागरिक बंधू व भगिनी यांनी आवश्यक उपस्थित राहावे असे आवाहन म.वा महामंडळाचे
डॉ.अविनाश जोशी-अध्यक्ष ,श्यामकांत भदाणे-उपाध्यक्ष ,रमेश पवार-उपाध्यक्ष श्री.सोमनाथ ब्रह्मे-कार्यवाह, नरेंद्र निकुंभ-कार्यवाह, शरद सोनवणे-कार्यवाह श्री.प्रदीप साळवी कोषाध्यक्ष ,प्रा.डॉ.पी.बी.भराटे-
सदस्य बन्सीलाल भागवत
श्रीमती स्नेहा एकतारे,संदीप घोरपडे,
सौ.वसुंधरा लांडगे,भैय्यासाहेब मगर
प्रा.डॉ.सुरेश महेश्वरी,प्रा.श्याम पवार
प्रा.सौ.शीला पाटील,अजय केले-
बजरंगलाल अग्रवाल,हेमंत बाळापूरे-ग्रंथपाल यांनी केले आहे.

