उल्हासनगर येथील जनसेवक डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना साप्ताहिक कल्याण नागरिक यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ प्रदान…..
![]()

उल्हासनगर येथील जनसेवक डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना साप्ताहिक कल्याण नागरिक यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ प्रदान…..
मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी भूषण महाजन :
साप्ताहिक कल्याण नागरिकच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कल्याण येथील बालक मंदिर शाळेच्या सभागृहात संपन्न झालेल्या गुरुवंदना विशेषांक प्रकाशन सोहळ्यात सेवानिवृत्ती नंतर देखील शैक्षणिक क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल उल्हासनगर येथील जनसेवक, मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष, कौन्सिल सदस्य जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सी तसेच ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील सेवानिवृत्त डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ प्राचार्य अशोक प्रधान मा. कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मच्छिंद्र कांबळे संपादक, प्रा. विलास पेनकर अतिथी संपादक, हिरामण सूर्यवंशी प्रमुख सल्लागार, प्राचार्य सुधीर घागस अध्यक्ष ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी, विजय देसले साहित्यिक व कवी, मनोज गोंधळी, अजय पाटील व घनशाम कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

