1 min read

नेरूळ येथे रक्तदान शिबीर संपन्न

Loading

नेरूळ येथे रक्तदान शिबीर संपन्न

प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख

नवी मुंबईत नेरुळ येथे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत निर्मिती मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून दिनांक २६ सप्टेंबर रोजी नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण मैदानात तेरापंथी युवक परिषद यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तेरणा हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या सहयोगाने पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबीराचे उदघाटन मा. सभागृह नेते तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र इथापे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुनिल होनराव, अशोक चटर्जी, तेरापंथी युवक परिषदेचे अध्यक्ष कांतीभाई कोठारी, प्रविण जैन, महेश बाफना, सुरेश सिंघवी, मनोज बदाला, दिनेश धोखा, रमेश मदरेचा, मुकेश बोहरा, दिलीप सिंघवी, प्रकाश बोहरा, देवेंद्र बोधा, धनराज सोनी, पियुष बाम, सुदेश सिंघवी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *