1 min read

नासप चे विद्यमान अध्यक्ष संजीव तुपसाखरे यांचे निधन

Loading

नासप चे विद्यमान अध्यक्ष संजीव तुपसाखरे यांचे निधन

सुभाष मुळे
पुणे प्रतिनिधी

नामदेव समाजोन्नती परिषदेचे विद्यमान अध्यक्ष, मा. श्री. संजीव विष्णुपंत तुपसाखरे, वय ६७ वर्षे यांचे सोमवारी दि (२५) रोजी पहाटे हृदयविकाराने आकस्मीक निधन झाले. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संजीव तुपसाखरे यांचे निधन झाल्याचे समजताच त्यांच्या निवासस्थानी मान्यवरांची गर्दी झाली होती. सायंकाळी ६.०० पर्यंत त्यांचे पार्थिव तुपसाखरे लॉन्स येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी ६.३० वाजता नाशिक अमरधाम येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्रातील शिंपी समाजबांधवाच्या सर्व शहर, जिल्हा व गावांगावातील ज्ञातीसंस्थेच्या वतीने नामदेव समाजोन्नती परिषदने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राजकीय, सामाजिक, सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. रविवार दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११.०० नामदेव समाजोन्नती परिषदेचे कार्यालय, बाजीराव रोड, जनता बॅकेसमोर, पुणे येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नामदेव समाजोन्नती परिषद, या शिंपी समाजाच्या शिखर संस्थेच्या माध्यमातून पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांचे स्मारक होण्यासाठी प्रयत्नवादी होते. शून्यातून विश्व निर्माण केलेल्या कै. तुपसाखरे यांनी काही काळ रिक्षाही चालवली. शहरात सायकलने फिरून घराघरापर्यंत काँग्रेस पोहोचण्याचे त्यांनी अभियान राबवले. १९८५ ते ९० या काळात ते युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. काँग्रेसने त्यांना १९९७ ते २००२ या काळात स्वीकृत नगरसेवक म्हणून संधीही दिली. माजी खासदार कै. मुरलीधर माने यांचे ते जवळचे सहकार म्हणून सर्वांना परिचित होते.
नाशिक शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक, नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ, प्रांतिक नामदेव शिंपी समाजोन्नती संस्था, संत नामदेव प्रतिष्ठान शहर नामदेव शिंपी पंचमंडळ, शहर नामदेव अहिर- शिंपी या संस्थावर त्यांनी पदे भूषवले होते. त्यांच्या निधनामुळे नामदेव समाजोन्नती परिषदेचेे कधीही न भरून येणारे असे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *